आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल* *वांगेपली,वट्रा व किष्टापूर दौड़ ग्राम पंचायतसाठी

42

▪️माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात▪️
✒अहेरी :- अहेरी तालुक्यातील तीन  ग्राम पंचायतीचे मुदत संपली असून या तिन्ही ग्राम पंचायतींमध्ये सदस्यसह थेट सरपंचपदासाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असुन  दिनांक १८ डिसेंबर २०२२ ला मतदान होणार आहे.
           या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जनतेतून थेट सरपंच पद निवड करायचे असून २८ नोहेंबर ते २ डिसेंबर 2022 ला नामांकन अर्ज करायचे शेवटच्या दिवस होता.
       त्यामुळे  ग्राम पंचायत वांगेपली,वट्रा व किष्टापूर दौड़ तिन्ही ग्रामपंचायत  सार्वत्रिक  निवडणुका करिता आदिवासी विद्यार्थी संघाकडून नामांकन दाखल करण्यात आली.असून आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री. दिपकदादा आत्राम  व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात आज तहसील कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी श्री.चव्हाण साहेब,श्री.नागूला  साहेब,इद्दावार सर यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आले.
     यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,माजी जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,अहेरीचे नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,खमनचेरूचे सरपंच श्री.सायलू मडावी, इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,महागावचे ग्राम पंचायत सदस्य श्री.राजेश दुर्गे,वंदना दुर्ग,माजी सरपंच श्री.रमेश पेंदाम,नागापूरे,विनोद रामटेके,किशोर मडावी,महेश नैताम,वासुदेव सिडाम,सूरज तलांडे,व सरपंचपदचे उमेदवार व सदस्यगण व आविस कार्यक्रम उपस्थित होते