आलापल्ली: अशोक जुटूवार राहणार आलापल्ली हे काही कामानिमित्त नंदिगाव येथे जाऊन येत असताना पुसूकपल्ली फाट्याजवळ आलापल्ली पासून 8 किलोमीटर अंतरावर गाडीचे संतुलन बिघडून खाली पडले व त्यात ते गंभीर जखमी झाले घटनास्थळी उपस्तीथ काहींनी शासकीय रुग्णवाहिकेला संपर्क केला असता रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती तेव्हा उपस्तीथ असलेल्या एकाने स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांना त्वरित आलापल्ली येथील सलुजा हॉस्पिटल येथे भरती केले आणि त्यांच्या परिवाराला ही संपर्क करून अपघाताची माहिती दिली प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले*