बुर्क मलमपल्ली (टोला)येथील रात्रकालीन टेनिस बॉल यार्ड सर्कल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

41

मलमपल्ली:अहेरी तालुक्यातील बुर्क मलमपल्ली टोला येथे वीर बाबुराव समितीकडून रात्रकालीन टेनिस बॉल 30 यार्ड सर्कल सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

          या उदघाटन समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडूके, नागेपल्ली ग्राम पंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे, ग्रा.पं. सदस्य आशिष पाटील, ग्रा.पं. सदस्या मायाताई मडावी,माजी सरपंच दिवाकर मडावी,पोलीस पाटील किशोर शिडाम, माजी सरपंच विजय कुसनाके,विशाल रापेल्लीवार,कोतवाल संतोष मडावी,शंकर पानेम,दल्लू गावडे,जुलेख शेख,कार्तिक तोगम,झुरू पुंगाटी,सुनील वड्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

            रात्रकालीन टेनिस बॉल सामन्याचे उदघाटन येथील वीर बाबुराव पटांगणावर विधिवत पूजा अर्चा करून करण्यात आली.

               यावेळी उपस्थितांना माजी आमदार आत्राम यांनी उदघाटनिय व माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी अध्यक्षीय भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.

                या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून पंधरा हजार रु.रोख तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार आत्राम यांच्याकडून दहा हजार रु व तृतीय पुरस्कार सरपंच कोडापे व उपसरपंच शानगोंडावार यांच्या कडून सात हजार सह अनेक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले.

            टेनिस बाल उदघाटनिय सोहळ्याचे संचालन व आभार विशाल रापेल्लीवार यांनी मानले.