हक्काच्या रोजगारासाठी संघटीत होणे काळाची गरज – प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा संदीप भाऊ कोरेत

64

मुलचेरा :तालुक्यातील आंबटपल्ली येथे संदिपभाऊ कोरेत यांच्या अध्यक्षतेखाली युवकांचे सभा घेण्यात आले होते.
 युवकांना मार्गदर्शन करतांना संदीप भाऊ म्हणाले की, एटापली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर जी कंपनी येऊन उत्कननाचे काम करीत आहे व आपल्याला आपल्या हक्काच्या रोजगारा पासुन वंचित ठेवत आहे आपल्या हक्काचा रोजगार मागण्या साठी संघर्ष करणे गरजेचे आहे व त्या साठी आपण संघटीत होणे गरजेचे काळाची गरज आहे. संघटित होऊन आपल्या हक्काच्या

 रोजगाराकरिता संघर्ष करून आपली हक्क आपण घेऊ करिता एटापली  येथे १२ डिसेंबर रोज सोमवार ला होऊ घातलेल्या लाक्षणिक उपोषण घेण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी सहभागी व्हावे. अशी प्रदेश सदस्य संदिप भाऊ कोरेत यांनी आवाहन केले.