दिनांक 11/12/2022 रोजी उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे मा.पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख सा. यांचे संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली *पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून* व नम्रता फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानातून भव्य जनजागरण मेळावा,आधार कार्ड पॅन कार्ड वाटप व विविध वस्तू वाटप कॅम्प* चे आयोजन करण्यात आले.
सदर मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून SRPF Gr.No 9 अमरावती चे पोनि उईके साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून नम्रता फाऊंडेशन नागपूर टीमचे अविनाश सर,नम्रता मॅडम, सुप्रिया मॅडम,डिंपल मॅडम, आवलमारी गावचे उप सरपंच श्री चिरंजीव, आश्रमशाळा, अवलमारी चे अधिक्षक श्री कोंडे सर, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलिस पाटील व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोउपनि श्री. संजय कुकलारे सा.,पो पोउपनि श्री.काळे सा तसेच व्यंकटापूर पोलिस स्टेशन हद्दीतील 150 ते 200 नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते..
सदर जनजागरण मेळाव्या दरम्यान सर्व उपस्थित नागरिकांना पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोउपनि श्री. संजय कुकलारे यांनीं पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेणायचे आवाहन करून कल्याणकारी शासनाच्या विविध योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पोउपनि श्री.काळे यांनी आगामी चिन्नावट्रा ग्रामपंचायत निवडणूकच्या अनुषणगाने हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना देण्यात आली.
सदर जनजागरण मेळाव्या दरम्यान उपस्थित गरजू नागरिकांना व विद्यार्थ्यांना खालील वस्तू वाटप करण्यात आल्या.
*1) ब्लॅंकेट 50*
*2) प्लॅस्टिक टोपली 50*
*3) विध्यार्थीना पाण्याच्या बाटल 50*
*4) विद्यार्थ्यांना नोट बुक 50*
*5) पॅन कार्ड वाटप 25*
*6) आधार कार्ड वाटप 15*
*7) पासबुक वाटप 10*
*8) सुकन्या समृद्धी पासबुक वाटप 3*
*9) ) मा. मा.पोलीस अधीक्षक सा गडचिरोली यांचे कडून अनुसूचीत जातीच्या बचत गटाना मिळालेली धान रोवणी मशीन बचत गटाच्या ताब्यात देण्यात आली.*
सदर कार्यक्रमाच्या सूत्र संचलन पोशि भंडारी यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रदर्शन पोहवा वडेट्टीवार यांनी केले सादर भव्य जनजागरण मेळाव्यात मान्यवरांना व नागरिकांना पोहवा तोरे यांनीअल्पोपहार व चहाची व्यवस्था केली. सदर मेळाव्याचा 150 ते 200 ग्रामस्थांनी लाभ घेतला* तसेच सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता जिल्हा पोलीस अधिकारी पोउपनि श्री. चौधरी सा, पोउपनि श्री. नैताम सा. पो.हवा सडमेक, धकते, सयाम, पोरतेट, अत्राम, निलम, तोडासे पो.ना पुंगाठी, पो.शि. नांदे, जेनठें, कुंभरे, वाडेकर, म.पो. शि. गेडाम मॅडम, अत्राम मॅडम चेतना, मनीषा spo कार्तिक यांनी संघभावनेने परिश्रम घेतले.
Home Breaking News पोलीस स्टेशन व्यंकटापुर व नम्रता फाउंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानातून हद्दीतील गरजू...