दिल्ली येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात संसद भवनात गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा,आरोग्याची चांगली दर्जेदार सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ३७७ नियम अन्वये मेडिकल कॉलेज निर्मिती संबधी मागणी ~खासदार अशोकजी नेते

65

दिं.१२ डिसेंबर २०२२
दिल्ली:-गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात संसदेमध्ये३७७ नियम अन्वये गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून चांगली सेवा मिळावी. यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी मेडिकल कॉलेज आवश्यकता असल्याने लोकसभा क्षेत्रात महत्त्वाचा प्रश्न संसदेमध्ये मांडून लक्ष वेधले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्यात आरोग्य च्या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत सामान्य जनतेला व नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी मेडिकल कॉलेजची आवश्यक असल्याने दिल्लीत  सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ३७७ धारा अन्वये लक्ष वेधले.
 गडचिरोली हा अतिशय मागासलेला  बहुल आदिवासी भाग म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र हा सर्वात लांब दुर्गम भाग आहे. या भागात आरोग्य सेवेचा मोठा अभाव आहे.
यापूर्वीही मी गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी सभागृहात केली होती. आणि राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर केंद्र निश्चितपणे मान्यता देईल,असे आश्वासनही दिले होते.
गडचिरोली येथे नविन वैद्यकिय महाविद्यालय स्थापीत करण्याकरीता मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे,व उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणविस,महाराष्ट्र राज्य हे दिनांक ११/०७/२०२२ रोजी पुरपरीस्थितीचा आढावा घेण्याकरीता गडचिरोली येथे आले असता, त्यांनी गडचिरोली जिल्ह्याकरीता शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा केलेली आहे. परंतु राज्य सरकारकडून प्रस्ताव अद्याप प्राप्त न झाल्याने त्यात नाहक विलंब होत आहे.
त्याकरिता दिल्ली च्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये  ३७७ नियम अन्वये संसद भवनात गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती करण्यासंबंधी खासदार अशोकजी नेते यांनी मागणी केली.