कोंजेड येथे विकास कामांचे लोकार्पण
अहेरी:-ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असतो. या ठिकाणी येणार्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.त्या अतिदुर्गम,आदिवासीबहुल कोंजेड येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होत्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, कोंजेडचे सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच सीताराम शंकर मडावी, पोलीस पाटील गोसाई वेलादी,सदस्य श्याम रंगा मडावी, अशोक वेलादी, हणमंतू वेलादी,शंकर मडावी,सुरय्या वेलादी,संतोष वेलादी, रुपेश कारेंगुलवार,मुकुंद तेलाम जाफर अली,मखमुर शेख,इरफान शेख,
आदी उपस्थित होते
कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिऱ्हाडघाट, मेट्टीगुडम, लोहा,कल्लेड आणि कोंजेड आदी गावात मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामे करण्यात आले.या गावांना भेटी देऊन भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांची समस्या जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केल्या. ग्रामस्थांनी भाग्यश्री आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर यांच्याहस्ते कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत विविध गावातील सिमेंट काँक्रेट रस्ते,मोरी बांधकामाचे लोकार्पण आणि अंगणवाडी ईमारत आणि सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना गावाची लोकसंख्या किती आहे ? हे न बघता मी कोणत्याही गावाची गरज पाहून विकासकामांना प्राधान्य देते. यामुळे कोंजेड सारख्या लहान गावात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून या माध्यमातून ग्रामस्थाना सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. भविष्यात देखील याच प्रकारे आपण विकासकामांसाठी कटीबध्द राहू अशी ग्वाही त्यांनी दिली
तब्बल 60 लाख रुपयांचा निधीतून याठिकाणी विकास कामे करण्यात आल्याने ग्रामपंचायत अंतर्गत गावांचा चेहरामोहरा बदलून गेला.अगदी छोटा ग्रामपंचायत असूनही मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामे केल्याने गावकऱ्यांनी ताईंचे आभार मानले.