महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या पदी नंदू पढाल यांचा सर्वानुमते नियुत्कीपत्र देऊन निवडकरण्यात आली

48

भद्रवती दि.18:-  हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर विधान भवनावर दिनांक २६ डिसेंबर २०२२ काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाच्या नियोजनाबाबत दिनांक १६ डिसेंबर २०२२ ला हॉटेल शिवालय गजानन वाटिका जवळ शेगाव येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीमध्ये राज्यातील सर्वच समाज संघटनांचे तसेच राष्ट्रीय स्तरावरचे नेते उपस्थित होते, याच बैठकीत राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री भाऊसाहेब बावणे यांनी मागील पंचवीस वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय असलेले श्री नंदू पढाल नगरसेवक न. प. भद्रावती, जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रपूर व शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष या पदी सर्वानुमते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली, तसेच या बैठकीत उपस्थित सर्वच संघटनेच्या नेत्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि २६ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर २१ मागण्या घेऊन भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी भाऊसाहेब बावणे, श्री म्हात्रे, एडवोकेट वानखेडे, श्री नंदाने, श्री साठवणे, श्री नेमाडे, एडवोकेट अमोल बावणे, श्री अशोक पडगिलवार, श्री प्रमोद हजारे इत्यादी नेते उपस्थित होते. श्री नंदू उर्फ नरेंद्र पढाल यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.