बोनथळा तालुक्याती घटना. वाघाच्या हल्यात बैलाचा मृत्यु .

56

भद्रावती दि.18:–गोठ्यात बांधुन असलेल्या बैलावर हल्ला करुन त्याला वाघाने ठार केल्याची घटना दिनांक 18 रोज रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोनथळा या गावातील शेतशिवारात उघडकीस आली.बैलाच्या मृत्युमुळे शेतकऱ्याचे जवळपास सत्तर हजाराचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमुने घटनास्थळी पंचनामा केला.तालुक्यातील बोनथळा गावात भद्रावती शहरात राहणाऱ्या पंढरी ठेंगणे यांची शेती आहे.या शेतातील गोठ्यात त्यांचीपाळीव जनावरे नेहमी बांधुन ठेवल्या जाते.घटनेच्या दिवशी ठेंगणे हे आपल्या शेतावर सकाळी गेले असता त्यांना वाघाने बैलाला ठार केल्याचे लक्षात आले.त्यांनी लगेच याची माहिती भद्रावती वनविभागाला दिली माहिती मिळाल्यानंतर भद्रावती वनविभागाची चमु घटनास्थळी पोहोचली व पंचनामा केला.बैलाचा मृत्यु झाल्यानेठेंगणे यांचे सत्तर हजाराचे नुकसान झाले.व त्यांची शेतिची कामेही खोळंबली.या परिसरात सतत वावरत असलेल्या वाघामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाल आहे.