एटापल्ली तालुक्यातील वेनहारा इलाका पारंपारिक गोटुल समितीच्या सौजन्याने अनुसूचित क्षेत्रातील पेसा आणि वनहक्क कायदा दिवस

62

एटापल्ली :दिनांक २४ डिसेंबर २०२२ शनिवार ला स्थळ  वेनहारा इलाका गोटुल भुमी चौक, कसनसुर येथे ७० गावाच्या वतीने पेसा दिवस म्हणून महोत्सव साजरा करण्यात आला.
  पेसा कायदा ह्या संविधानाच्या ५ व्या अनुसूची नुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या तरतूदी केल्या होत्या त्यानुसार पेसा कायद्याची निर्मिती करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकरानी घटनेमध्ये ५ वी अनुसूची व ६ वी अनुसूची आदिवासी भागातील प्रशासनिक व्यवस्था संदर्भात तरतूद केलेली होती. त्यानुसार २४ डिसेंबर १९९६ ला केंद्र सरकारने देशामध्ये पेसा कायदा लागू केला. त्यानुसार गावामध्ये राहणारे आदिवासी व गैरआदिवासी १८ वर्षांवरील संपूर्ण जे मतदार आहेत, त्यांना मिळून प्रत्येक गावात ग्रामसभा ला मान्यता दिली. ग्रामसभेला विशेष असे अधिकार देण्यात आले. ज्या अधिकारामधून गौण वनोउपज, गौणखानिज, गावातील व्यवस्थापन, बाजारातील व्यवस्थापन व आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरेनुसार त्या भागातील त्या गावातील स्वयंशासन चालवण्याचे अधिकार या पेसा कायदा अंतर्गत ग्रामसभेला देण्यात आले. हि परंपरा व पेसाची व्यवस्था पूर्वी पासून आदीवासीच्या चालीरीती परंपरा त्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्थापन मध्ये होत्या. तेच कायद्याच्या रूपाने २४ डिसेंबर १९९६ ला केंद्र शासनाने घटनादत्त मान्यता देण्यात आलेली आहे. परंतू पेसा व वनहक्क कायदा अंतर्गत त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला त्या पद्धतीने अमलबजावणी होत नाही आहे. तरी शासन प्रशासन दक्षता घेऊन पेसा आणि वनहक्क कायदेची अमलबजावणी योग्य प्रकारे केल्यास आदिवासी भागामध्ये सुशासन निर्माण होण्यास मदत होईल. तसेच केंद्र सरकार ग्रामसभेचे अधिकार कमी करण्याचं प्रयत्न करत आहेत हे योग्य नाही, आणि हे कदापि होऊ देणार नाही आणि केंद्र सरकार ग्रामसभेचे अधिकार कमी केल्यास हाणून पाडला शिवाय आदिवासी समाज शांत बसणार नाही. असे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आदिवासी जनसमुदायाला संबोधित केले.
  या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दीपक आत्राम, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चरडूके गाव भूमिया बाजुजी गावडे, डॉ ब्रम्हानंद पुंघाटी, घिस्सा मडावी, गोसू हीचामी, लालसू नरोटे,  जोगी पा उसेंडी, संनु झोरे, गंगाराम इस्टाम, अडवे कांदो, सनु नरोटे, शावू मटामी, कल्लू झोरे, सुधाकर नरोटे, मोहन गुमाडी, रैजी मडावी, महादेव पदा, जयाताई पुळो, शितल तिमा, पांडुरंग गावडे, मंगेश हीचामी, छायाताई हीचामी, बेबीताई हेडो, प्रकाश पुंघाटी आदी मान्यवर उपस्थित होते.