बस सेवा बंद असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे:रेगुंठा परीसरातील

55

सिरोंचा :तालुका मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परीसरातील बसफेरी बंद असल्याने या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत.प्रवासासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रेगुंठा बसफेरी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रेगुंठा कोटापल्ली परिसरात जवळपास 20 गावे येतात या गावांमधील शेतकरी, विध्यार्थी तसेच नागरिक रोज सिरोंचा मुख्यालयात असलेले तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, बँक अशा विविध कार्यालयात कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने तालुका मुख्यालयात यावे लागते.मात्र बस  सेवा बंद असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रासासोबत आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.रेगुंठा परिसरातील गावांसाठी अहेरी आगारातून सिरोंचा रेगुंठा आणि गडचिरोली रेगुंठासाठी बससेवा सुरू होती.मात्र कोरोना काळापासून ही बससेवा बंद करण्यात आले आहे.या वर्षी मे महिन्यात   बसफेरी चालु झाली होती.बससेवा सुरू झाल्याने  परिसरातील नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला होता.मात्र  चालू झाला पाच सहा दिवसात पुन्हा पूर्णपणे बससेवा बंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर या परिसरात बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.