खासदार अशोकजी नेते यांनी बंगाली समाज‌ बांधवाचे नमोशुद्ध पौड्रो व राजवंशी यांना अनु.जाती चे प्रमाणपत्र पुर्ववत देणेसंबंधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र जी फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली

61

*बंगाली समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध ..खासदार अशोक नेते*

दिं.२७ डिसेंबर २०२२

नागपुर:-नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणविस उपमुख्यमंत्री यांना  निवेदनाद्वारे खासदार अशोकजी नेते यांनी बंगाली समाजासाठी मागणी करतांना  महाराष्ट्रातील पुनर्वसित बंगाली बांधवाचे नमोशुद्ध पौड्रो व राजवंशी यांना अनु. जाति चे प्रमाणपत्र पुर्ववत देणेसंबंधी २०१९ मधील बार्टी तर्फे झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रशासनाकडे पाठविण्यात यावे.या बाबत महाराष्ट्र राज्यात १९७१ नंतर बंगाली समाजाचे मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्हयात पुनर्वसन झालेले आहे. बंगाली समाजातील नमोशुध्द्र पौड्रो व राजवंशी हे अनु जाति मध्ये मोडतात. परंतु इतर राज्यांप्रमाणे त्यांना अनु. जाती चे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना शासनांच्या अनु. जातीच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. सन २०१९ मध्ये बार्टी तर्फे सदर संबंधी सर्वेक्षण झालेले आहे.करीता सदर सर्वेक्षण केंद्रशासनास पाठवुन पुर्ववत मिळण्याचा मार्ग सुकर करावा व या समाजाच्या घटकांना अनु. जाती चे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना खासदार अशोकजी नेते यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.