भगवंतराव आश्रम शाळेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम*
मुलचेरा:- आजची पिढी ही अत्यंत संवेदनशील असून त्यांची आकलन शक्ती प्रभावी आहे. या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरीचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मुलचेरा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे उदघाटन यांच्याहस्ते करण्यात आले,यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुलचेराचे जेष्ठ नागरिक मारोती वेलादी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,जेष्ठ नागरिक गणपत मडावी,नगर पंचयातचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी,नगर पंचयातचे बांधकाम सभापती मोहना परचाके,माजी जि प सदस्य लैजा चालूरकर,नगर सेवक उमेश पेळूकर, नगरसेविका सपना मडावी, नगरसेविका मंगला आलाम, नगरसेविका मनीषा गेडाम, नगरसेवक दिलीप आत्राम, नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष वनिता आलाम, विवेकानंदपूर ग्रामपंचायतीचे सदस्य आम्रपाली दुर्गे,प्रतिमा डोर्लीकर,गणेश बंकावार, मुख्याध्यापक लतीफ शेख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. मागील काही वर्षे कोरोना काळात हे कार्यक्रम होऊ शकले नाहीत आता हे कार्यक्रम होत आहेत त्यांचा आनंद घ्या.विशेष म्हणजे पालकांनी सुद्धा विध्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे त्याच क्षेत्रात त्यांना जाऊ द्यायला पाहिजे.केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हेतर विविध क्षेत्रात नावलौकिक करण्याची संधी आहे.आपल्या आदिवासी मुलामुलींमध्ये उत्कृष्ठ खेळाडू आहेत त्यांच्यामधील क्रीडाकौशल्य तपासून शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास चांगले नामांकित खेळाडू घडतील.असे भाग्यश्री ताई आत्राम यांनी आवर्जून उल्लेख केले.
भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुलचेरा येथे आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.यासाठी शाळेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली.विद्यार्थ्यांनी सुद्धा पहिल्याच दिवशी विविध खेळात आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केला तर सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण होणार आहे.