जाफराबाद येथील शेतीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर झाड पडून चार महिन्यापासून रस्ता बंद

58

रवि बारसागंडी सिरोचा तालुका प्रतिनिधि

*नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज*

*शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता होत आहे अडचण*

जाफराबाद: दिनांक ७) – सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथील शेतीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर गेल्या जून जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर झाड पडून शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. याची माहिती मागिल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती होती पण जाणुन बुजुन मागिल सत्तेवर असणारे ग्रामपंचायत प्रशासनाचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना दोन किलोमीटर प्रवास करून फिरून यावे लागते आहे लवकरात लवकर रस्त्यावरील झाड काढून काढून रस्ता चालू करावी अशी  शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे

नवनिर्चित सरपंच उपसरपंच सदस्यांनी लक्ष देण्याची गरज

नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी या समस्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावरील झाड काढून रस्ता काढून देण्यात यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून होत आहे