आजोबाच्या विश्वासास सार्थ करून जया बनली सीए

42

जितेंद्र लाखोटिया तेल्हारा तालुका,प्रतिनिधि
  तेल्हारा: हिवरखेड येथील उद्योजक नवलकिशोर टावरी यांची सुपुत्री कु. जया टावरी हिने आपले आजोबा रामगोपालजी टावरी  यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत सी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली आहे.कु. जया टावरी हिने  वर्ग 10 वि पर्यंतचे शिक्षण हिवरखेड गावातच घेऊन अकरावी पासून आपले करिअर घडविण्यासाठी अकोला येथे विविध कोचिंग क्लासेस मध्ये अभ्यास करून यावर्षी सी.ए परीक्षा उत्तीर्ण केली.कु. जया  टावरी या विद्यार्थिनीने चार विषयात डिस्ट्रिक्शन घेतले असून अतिशय कठीण परीक्षा असलेले सीए परीक्षा उत्तीर्ण केली हे इथे उल्लेखनीय बाब .
जया आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व आजोबा यांना देते.  .