आलापल्ली:१२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणुन देशभरात विविध उपक्रम, कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा केला जातो स्वामी विवेकानंदांचे जीवन सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि त्यांना एक नवीन जीवनशक्ती मिळते. प्रख्यात आणि तेजस्वी स्वामी विवेकानंद हे वेदांचे पारंगत होते.
विवेकानंद जी एक दूरदर्शी विचारवंत होते ज्यांनी भारताच्या प्रगतीत योगदान दिले आणि आपल्या समकालीनांना जगण्याची कला दिली. स्वामी विवेकानंद हे भारताच्या वसाहतीत त्यांचे सर्वात मोठे सहयोगी होते आणि त्या देशातील हिंदू धर्माच्या वाढीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
अश्या अध्यात्मिक आणी तत्वज्ञानी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनपर्यंत पोहचवण्याकरीता आज स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राजे धर्मराव विद्यालय आलापल्लीला स्वामी विवेकानंद जीवन चरित्र विषयी पुस्तके भेट म्हणून अमित येनप्रेड्डीवार, सागर डेकाटे,स्वप्नील नौनूरवार,रोहित मुक्कावार यांच्या तर्फे देण्यात आले.