समाजहितकारक दिनदर्शिकेचे विमोचन संपन्न

63

जितेंद्र लखोटीया
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा दि.17(ता प्र) तेल्हारा शहरातील माजी नगरसेविका आरती ताई गायकवाड व भाजपा शहर सरचिटणीस गजानन गायकवाड यांनी कल्पकतापूर्वक प्रभाग क्र.8 मधील नागरिकांसाठी जनकल्याणकारी योजना तथा समाजहितकारक माहिती दर्शविणारी दिनदर्शिका प्रकाशित केली असून नुकतेच सदर दिनदर्शिकाच्या विमोचनाचा मंगलसोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.नववर्षांचे औचित्य साधून दिनदर्शिकेचा विमोचन व वितरण समारंभ भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर,आ.प्रकाश भारसाकळे,आ.गोवर्धन शर्मा,आ. हरीश पिंपळे,आ.वसंत खंडेलवाल, माजी आ. चैनसुख संचेती,विजय अग्रवाल,विजय मालोकार,बळीराम सिरस्कार,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड,माधव मानकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे, ता.अध्यक्ष गजानन उंबरकार,माजी न.प.अध्यक्ष जयश्रीताई पुंडकर, कुसुमताई भगत,नरेश आप्पा गंभीरे,विजय देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला  प्रभाग क्र 8 मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनसाठी ग्रंथालय उघडुन त्यात स्पर्धा परीक्षे करीता लागणारी विविध पुस्तके ऊपलब्ध करुण दीले, नागरिकांच्या आरोग्याच्या हेतुने कोरोणाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी शरीरातील रोग प्रतीकार शक्ती वाढावी या उद्देशाने मोफत औषधी वाटत केला,महीलांन साठी ऊज्वला गँस योजने अंतर्गत माहितीचे कार्यक्रम आयोजित करुन 110 नागरिकांना याचा लाभ करुण दिला,शहरात सर्वप्रथम लसीकरण शिबीर घेऊन या 4 वेळा घेतलेल्या सीकरण शिबीरात बुस्टर डोज सहीत प्रत्येक शिबिरात 275 नागरिकांनी लसीकरण करुण घेतले,आरोग्य विभागात आवश्यक असणाऱ्या रक्तदाणाचे 2 वेळा रक्तदान शिबीर आयोजित केले, जिवण बिमा अंतर्गत प्रधानमंत्री जिवण बिमा योजनेच्या अंतर्गत 2020 ते 2021 पर्यंत युनियन बँक,भारतीय स्टेट बँक,सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांचे स्व खर्चाने प्रत्येकी शकडो च्या वर नागरिकांचे विमे काढुन घेतले,नवीन मतदार नोंदणी शिबीरात 225 युवक युवतींनी मतदार नोंदणी करुण घेतली, प्रभागातील नागरिकांना शाशनाच्या प्रत्येक योजनेची माहिती व्हावी याकरिता प्रशासन आपल्या दारी कार्यक्रम राबवीला,मतदार कार्डशी आधार कार्ड जोडणीबाबत शिबीरात 400 च्या वर नागरिकांची आधार जोडणी करुण घेतली,कोरोणा काळात वयोवृद्ध व निराधार नागरिका करीता पैसे काढण्याच्या सेतुची व्यवस्था इंदिरा नगर येथे सुरु केली, संपूर्ण तेल्हारा शहरातील गरजु नागरीकांसाठी 3 वेळा मोफत आरोग्य तपासणी गोळ्या औषधीसह शिबिर आयोजित केले असता 485 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, डोळे तपासणी शिबीरात मोफत 3 नागरिकांनाचे  मोतीबिंदू आँपरेशन करुण 305 नागरिकांची डोळे तपासणी करुण मोफत चष्मे वाटप करण्यात आले,शासनाच्या विविध योजनांच्या करीता कोरोणा काळात दैनंदिन जिवणात लागणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्राचे मोफत वाटप करण्यात आले,तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कार्यक्रमात इंदिरा नगर मधील 250 नागरीकांचे घरकुल चे आँनलाउन फाँर्म भरुण घेण्यात आले,महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधुन गरजु विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत रक्तगट व रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले.अशा या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे