नागेपल्ली: येथील शुभम निमलवार हा युवक दिन पोलीस भरती ला गडचिरोली येथे गेला होता परत आलापली येत असताना मुलचेरा पासून पाच किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकी च अपघात झाला सदर अपघातात तो गंभीर जखमी झाला त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरित चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले त्यांना रोजच्या उपचाराकरिता 15000 ते 20000 रूपये खर्च लागून राहिला होता, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांची आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते, यांनी ही माहिती गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना दिली, मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी निमलवार कुटूंबाची हालाखीची परिस्थिती पाहून क्षणांचा ही विलंब न करता शुभम निमलवार यांच्या उपचारार्थ तत्काळ आर्थिक मदत केली व समोर कोणतीही मदत लागत असल्यास निसंकोच आपण मदत करू असे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी कुटुंबीयांना सांगितले.
Home Breaking News माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली नागेपल्ली येतील अपघातग्रस्त शुभम निलमवार...