विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ नागपूर विभागाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होते, अहेरी तहसील कार्यालय बुथवर माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वतः भेट देत मतदानाची पूर्ण माहिती घेतली, ह्यावेळी उपस्थित शिक्षक आणि भाजपा कार्यकर्त्यांशी आस्थेने संवाद साधला.
भाजपाचे समर्थन असलेले महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार ना.गो.गाणार यांच्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात आधीपासूनच राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी जातीने लक्ष देऊन, पूर्ण प्रचारयंत्रणा कामाला लावले, शिक्षकांच्या अनेक बैठका घेऊन जास्तीत जास्त मतदान त्यांच्या बाजूने व्हावे ह्यासाठी प्रयत्न केले होते,
त्याचा सकारात्मक प्रतिसाद अहेरी विधानसभा क्षेत्रात आज झालेल्या मतदानात दिसून आले आहे, आत्ता सर्वांच्या नजरा येत्या 2 फरवरी रोजी नागपूर येते होणाऱ्या मतमोजणी कडे लागले आहे..







