# B.J.Pअहेरी येते बँटमिटंन स्पर्धेचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे हस्ते बक्षीस वितरण संपन्न.

42

बँटमिटंन खेळाला प्रोत्साहन देणे काळाची गरज:-राजे अम्ब्रीशराव आत्राम









            अहेरी शहरात जवळपास १० वर्षांनंतर इलेव्हन स्टार स्पोर्टिंग क्लब, अहेरी तर्फे भव्य बँटमिटंन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते, सिंगल आणि  डबल्स मद्ये झालेल्या सामन्यांत खेळाडू आणि प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, ३ दिवस चाललेल्या ह्या स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने प्रेक्षकांनी बघितले.

            ह्या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न झाले, ह्यावेळी बोलतांना बँटमिटंन खेळल्याने शरीराचा उत्कृष्ट व्यायाम होतो, ह्यातून अनेक व्याधीतून आपण मुक्त होहू शकतो, नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी बँटमिटंन खेळणे ही काळाजी गरज आहे, ह्याचे महत्त्व ओढवून पुढील वर्षी भव्य बँटमिटंन स्पर्धा अहेरी शहरात आयोजित करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू असे प्रतिपादन राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ह्यावेळी केले.

         ह्यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, गिरीश मद्देर्लावार, अतुल पवार, संकेत मुरमुरवार, कुणाल गट्टूवार, पंकज नौनूरवार, रवी जोरगलवार, अंकित सिडाम सह इलेव्हन स्टार स्पोर्टिंग क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.