#Bhagyashree Atramअहेरी ते आवलमरी, रेंगुठा बस सुरू करा

45

अहेरी तालुक्यातील अहेरी ते आवलमरी (व्यंकटापूर), रेंगुठापर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस सुरू करण्याची मागणी जि.प. माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम व नागरिकांनी अहेरी आगार व्यवस्थापकाकडे निवेदनातून केली आहे.
गावकऱ्यांच्या मागणीनुसार व शालेय विद्यार्थ्यासाठी एसटी बस आवश्यक आहे. अहेरी तालुका मुख्यालय असल्याने येथे शिक्षणासाठी आवलमरी, रेंगुठा गावातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत.
मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावकरीही कार्यालयीन कामकाजासाठी येतात. अहेरी मुख्यालयात एसटी बसने ये-जा करणे सोयीचे होत असून अहेरी ते आवलमरी, रेंगुठा मार्गे बस सुरू करावी, अशी मागणी भाग्यश्रीताई आत्राम व गावकऱ्यांनी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.