दि,.१०/०२/२०२३ रोजीचे पहाटे ०१.०० वा. ते सकाळी ०९.३० वा.चे. दरम्यान मीजे मेढा ता. जावली जि.सातारा गावचहे हद्दीत मेढा ते महाबळेश्वर जाणारे रोडचे डावे बाजूस असलेल्या सुदर्शन फॅब्रीकेशन दुकानाचे समोरील खड्डयात मयत राम बाबू पवार वय ३६ वर्षे रा.गांधीनगर मेढा ता. जावली जि.सातारा यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात सिमेंटच्या ओबड धोबड दगडाने व लाकडी फळीने मारहाण करुन खुन केला आहे म्हणून वगैरे दिले फिर्यादीवरुन मेढा पोलीस ठाणे ३३/२०२३ भादविक ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्रीमती शितल जानवे खराडे उपविभागीय पोलीस अधिकारी बाई विभाग वाई, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर मेढा पोलीस ठाणे यांना तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी जावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळावर आल्यानंतर श्रीमती शितल जानवे खराडे उपविभागीय पोलीस अधिकारी बाई विभाग, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांनी घटनास्थळा जवळील व आजूबाजूचे परिसरातील साक्षिदार लोकांचेकडे विचारपूस केली तसेच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता फुटेजमध्ये गुन्हा घडला त्यावेळी पिवळया व काळया रंगाचे जर्किन परिधान केलेले दोन संशयीत इसम आढळून आले
तद्नंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथके तयार करुन त्यांना प्राप्त फुटेजमधील संशयीत इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याचा सुचना दिल्या.
नमुद तपास पथके गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकास नमुद संशयीत इसम हे मेढा शहरात आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्यांनी मयत राम बाबू पवार हा दोन इसमांपैकी एकाचे वडीलांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्रास देत असल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला असल्याचे सांगीतल्याने गंभीर खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघडकीस आणला आहे..
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती शितल जानवे खराडे उपविभागीय पोलीस अधिकारी बाई विभाग बाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, मोहन पवार, प्रविण कांबळे, अजित कर्णे, गणेश कापरे, विशाल पवार, मोहसिन मोमीन, वैभव सावंत,
सचिन ससाणे, शिवाजी गुरव, पंकज बेसके सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, यशोमती काकडे, यशवंत घाडगे, निखील घाडगे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.