गरम राखेमुळे घनकचरा व्यवस्थापन डेपोला आग ?

99

प्रतिनिधी//
शहराच्या देसाईगंज-तुळशी मार्गावर असलेल्या मायाश्री अॅग्रो इंडस्ट्रीज या उसणा तांदूळ तयार करणाऱ्या मिलमधून निघणारी गरम राख परिसरात टाकण्यात येत आहे. गरम राखेमुळे परिसरातील अनेक जनावरांचा जीव गेल्याचे वास्तव असून गरम राख हवेमुळे पसरत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणिचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नगर परिषद व प्रदुषण विभागाकडे केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिसरात गरम राख टाकणे सुरुच असल्याने नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोला लागलेली आग त्या गरम राखेमुळेच तर नाही ना? या चर्चेला उधाण आले आहे.

देसाईगंज – तुळशी मार्गावर असलेल्या मायाश्री अॅग्रो इंडस्ट्रीजला कच्चा तांदूळ तयार करण्याची परवानगी असताना सदर मिल मध्ये उसणा तांदूळ तयार करण्यासाठी

बिनापरवानगी बेकायदेशीर बॉयलर चालविले जात असुन याकरिता मोठ्या प्रमाणात कोंडा जाळल्या जात आहे. निघणारी गरम राख परिसरातच टाकून विल्हेवाट लावली जात असून गरम राखेत फसुन नैनपुर वाडांतील एका शेतकऱ्याच्या म्हशीचा जडून मृत्यू झाला तसेच एक गुराखी भाजल्याचेही वास्तव आहे. सदर प्रकरण पैशाची देवाणघेवाण करून दाबून टाकण्यात आल्याचे समजते

काही दिवसापुर्वीच सदर राईसमिल मधील राख परिसरात टाकली जात असतांना हवेसोबत राख उडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. उडणारी राख अनेकांच्या डोळ्यांत जाऊन गंभीर ईजा झाल्याचे वास्तव असुन गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

याबाबत नगर परिषद तसेच प्रदुषण विभागाकडे नैनपुर तसेच भगतसिंग

वाडार्तील नागरीकांनी तक्रार करून देखिल कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने परिसरातील खुल्या जागेत बॉयलर मधुन निघणारी गरम राख टाकणे सुरुच असल्याने सदर राईसमिलला नगर प्रशासनाने परिसरात गरम राख टाकण्याचा अलिखित परवाना तर दिला नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.

दरम्यान जवळच असलेल्या नैनपुर वार्डातील घनकचरा व्यवस्थापन डेपोला १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत खत निर्मिती प्रकल्पाची लाखो रुपयाची यंत्रसामग्री जळुन राख झाली असली तरी लागलेल्या आगीचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यातच असल्याने शहरात तर्क वितकांना उधाण आले आहे.

मायाश्री अॅग्रो इंडस्ट्रीजच्या संचालिका राधिका आकाश अग्रवाल यांचे पती एका राजकीय पक्षाचा फुटकळ कार्यकर्ता

असुन बड्या नेत्याच्या जवळचा असल्याचे भासवित असल्याने प्रकरण दाबुन टाकण्यासाठी तर नगर प्रशासनाची धडपड नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. या आधी देखील घनकचरा व्यवस्थापन डेपोला आग लागली असुन त्यावेळी देखील डम्पिंग यार्ड जळीत प्रकरण दाबण्यात आले आहे.

शहराच्या देसाईगंज-तुळशी मार्गावरील परिसरात सदर मिल मधून निघणारी राख टाकल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव असतांना नगर प्रशासनाने करण्यात आलेल्या तक्रारीची अद्यापही दखल घेतली नसल्याने घनकचरा व्यवस्थापन डेपोला लागलेली आग टाकण्यात येत असलेल्या गरम राखेमुळे तर नाही ना? अशी चर्चा आहे नगर प्रशासनाने याही दिशेने तपास करून दोषी आढळून आल्यास मायाश्री अँग्रो इंडस्ट्रीजच्या संचालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.