माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे आयोजित कोडसेपल्ली येथे व्हॉलीबाल स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

103

*अहेरी:-* तालुक्यातील कोडसेपल्ली येथे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबाल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. संतोष मद्दीवार तसेच भाजप तालुका अध्यक्ष मा. श्री. विकास तोडसाम, संदीप गावडे यांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.भाजप पक्ष नेहमीच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून क्रीडा क्षेत्रातून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण निर्माण व्हावेत, या उद्देशाने असे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, यासाठी माजी राज्यमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज हे नेहमीच पुढाकार घेत आहेत.

या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा, आरोग्यदायी जीवनशैली व सकारात्मक विचारसरणीला चालना मिळते.यावेळी सर्व विजेत्या संघांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच सहभागी सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या!

प्रसंगीं संजय सडमेक ईलाका पट्टी शेंड्या, मालू तलांडी, जयराम गोंगले, नितेश आत्राम, निलेश तलांडी, सुरेश कुश्राम व मोठ्या संख्येने गावकरी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते!