गडचिरोली,(जिमाका)दि.17: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव सुरु आहे. व दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून इयत्ता 12 वी ची परीक्षा सुरु होणार आहे. तसेच दिनांक 06 मार्च 2023 रोजी जिल्हयात सर्वत्र होळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.. तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 20.02.2023 चे 00.01 वा ते दिनांक 06.03.2023 चे 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.