भाग्यश्री ताई आत्राम यांचा पुढाकार
अहेरी:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
अहेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने ‘भव्य मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले.या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ 37
बटालियनचे कमांडट शिवकुमार राव,बटालियन 9 चे कमांडट बाळापूरकर,अहेरी चे प्रभारी तहसीलदार दिनकर खोत,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, एड.मेंगनवार,श्रीकांत मद्दीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करत अभिवादन केले. त्यानंतर ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन स्पर्धा 2023 ला सुरुवात करण्याकरिता मान्यवरांच्या हस्ते शांतीचे प्रतीक कबुतरांच्या थव्याला आकाशात उडवून तसेच फुगे सोडून मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आले.
या मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थी,युवक, युवती आणि सीआरपीएफ 37 बटालियन व 9 बटालियनचे जवानांनी सहभाग घेतला.सुरुवातीला 15 ते 18 वर्ष (युवक) वयोगटातील स्पर्धक, युवती,18 वर्षावरील (युवक) त्यानंतर सीआरपीएफ चे जवान असे अनुक्रमे दौड साठी सोडण्यात आले.यात महिला गटात कु. द्रोपदा चिन्ना सिडाम (प्रथम),कु सपना बुकली पुसाली (द्वितीय) आणि कु.रविना भास्कर गावडे तृतीय आणि 15 ते 18 वर्ष वयोगटात युवकांमध्ये निखिल मनोहर गोटा
(प्रथम),राहुल भीमा मिच्छा (द्वितीय),भास्कर सीताराम मडावी (तृतीय) 18 वर्षावरील वयोगटात संपतराव लच्छा इष्टाम (प्रथम),विष्णू पोरीया विडपी (द्वितीय),मयूर मनोहर विडपी (तृतीय) तर सीआरपीएफ जवनांमध्ये आबीद अली (प्रथम), कसब बिश्वास (द्वितीय) आणि फकीर चंद तृतीय असे पारितोषिक पटकाविले.मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शिल्ड व रोख रक्कम देण्यात आले.
*युवा नेतृत्वाचे शानदार नियोजन
छत्रपती शिवाजी महाराज जयंती अहेरी मुख्यालयात दरवर्षीच मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मध्यंतरी कोरोनामुळे कुठलेही उत्सव साजरा करण्यात आले नव्हते. मात्र यंदा युवा नेते ऋतुराज हलगेकर आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी तीन दिवसापासून योग्य नियोजन करत शिवजयंती व मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन केले.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार,
नगरसेवक श्रीनिवास चटारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार,सुमित मोतकूरवार तसेच युवकांनी अथक परिश्रम घेतले. मॅरेथॉन स्पर्धेच्या दरम्यान अहेरी पोलिसांनी चोख असे बंदोबस्त ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.