# Gadchirolli#कारगील चौकात शिवजयंती उत्साहात

55

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
गडचिरोली शहरातील कारगील स्मारक येथे १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती प्रथमच आयोजीत केली होती. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते,उपाध्यक्ष रेवणाथ गोवर्धन, मार्गदर्शक नरेश चन्नावार, नंदू कुमरे, मोगली मसराम, रुपेश सलामे,जी.के.बारसिंगे,माजी नगरसेवक संजय मेश्राम, महेंद्र वाघमारे,गजानन बारसागडे, भाईचंद तुलावी आदी उपस्थित होते.