.भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) तलांडी कुटुंबियांचा मदतीला खंबीर पणे उभे

287

मौजा:-आरेंदा येथील मयत युवक साधु तलांडी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट व आर्थिक मदत
अहेरी तालुक्यातील मौजा आरेंदा येथील युवक साधु तलांडी (वय २५) हे हेमलकसा येथील विद्युत कार्यकारी अभियंता कार्यालय अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कामगार पदावर कार्यरत होते. दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी भामरागड तालुक्यातील मन्नेराजाम गावाजवळील परली येथे ११ के.व्ही. विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम विद्युत सहाय्यकासोबत सुरू असताना अचानक विद्युत शॉक लागल्याने साधु तलांडी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अहेरी विधानसभा क्षेत्राच्या नेत्या, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सिनेट सदस्य मा. भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांनी मौजा आरेंदा येथे जाऊन मयताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबियांचे दुःख जाणून घेत त्यांनी घटनेबाबत आस्थेने विचारपूस करून आर्थिक मदत दिली.
तसेच पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विद्युत सहाय्यक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, मयताच्या कुटुंबियांना कोणताही त्रास न होता लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भविष्यात कोणतीही अडचण आल्यास आपण स्वतः कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी मा. भाग्यश्री ताई आत्राम यांच्यासोबत श्रीनिवास विरगोनवार,उपसरपंच कुळमेथे ताई, देवाजी सडमेक,राकेश महा तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.