#Accient#दुचाकी अपघातातील जखमींची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

37

अहेरी – दि २१फेब्रुवारी२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्ली पासून सहा किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीस्वारांचा समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात एक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला अणि यात दोघे गंभीर जखमी झाले.करण अर्का व राजेश आलाम नामक व्यक्ती मिरकल या गावावरून आपल्या स्वगावी मोसमला जात असताना समोरून येणारे बहादूर आत्राम भामरागडच्या दिशेने निघाले होते या दोन
 दुचाकीस्वारांचा संतुलन बिघडून भीषण अपघात झाला यात बहादूर आत्राम (वय ४२) रा भामरागड यांचे जागीच मृत्यू झाला. ह्या भीषण अपघाता बाबत माहिती स्वराज्य फाउंडेशनला मिळाली व लगेच स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणी अपघातात गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले.
या घटनेची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केले.या अपघातात स्वर्गवासी झालेल्या बहादूर आत्राम यांचे शवविच्छेदन करून अहेरी नगरपंचायतचे स्वर्गरथ बोलावून त्यांचे स्वगाव भामरागडला मृतदेह पाठवण्यात आले.
यावेळी उपस्थित विष्णू मडावी नगरपंचायत उपाध्यक्ष भामरागड, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,नरेंद्र गर्गम राकेश सडमेकसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.