*अहेरी:-* बर्याच वर्षांपासुन दुरावस्थेत असलेल्या अहेरीच्या मुख्यरस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे दोन वर्षांपुर्वी गाजावाज्यात भुमीपुजन झाले.प्रत्यक्षात काम पुढे सरकत नव्हते. नागरीकांना होणारा त्रास वाढतच चालला होता. शेवटी भाजप तर्फे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. कार्यकारी अभियंता रोहीत रव्वा यांनी तात्काळ काम सुरु करुन लवकरच पुर्णत्वास नेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन थांबविण्यात आले.आज पुन्हा दुरुस्तीकामास सुरुवात झाल्याने नागरीक आनंद व्यक्त करीत आहेत आणि एकदाची सुटका होत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत.
भाजपच्या आंदोलनाची सर्वच शासकीय विभागांनी धास्ती घेतली असुन आता पुढे कोणते आंदोलन राहील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.







