पेरमीलीत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

40

पेरमीली येथील भगवंतराव हायस्कूलच्या वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
    सर्वप्रथम दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वर्ग नववीच्या मुलांकडून तथा कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
    अध्यक्ष स्थानावरून पठाण यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देऊन पुढील शिक्षणात जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने ज्ञान घेण्याचे आवाहन करून आपल्या गावाचे, शाळेचे व आई-वडिलांचे नाव लौकिक करण्यास सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम यांनीही पुढील वाटचालीच्या शुभेच्छा मुलांना दिल्या. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभात भाग घेतला.
   संचालन नववीची विद्यार्थिनी सलोनी मुंजमकर तर आभार प्रियंका मंडल हिने मानले.