राजाराम येते धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांना कडून निवेदन देऊन मागणी

278

राजाराम** आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित राजाराम र. नं, 1304
असून राजाराम येथे खारीप हंगामा 2025-26 साठी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
प्राप्त माहिती नुसार मौजा राजाराम येते गेल्या १०-२० वर्षापुर्वी आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था उपल्बध होती. मात्र काही कारणास्तव सदर संस्था कमलापुर येथे स्थानांतरीत करण्यात आली असून राजाराम परिसरातील, खांदला, पत्तीगांव, चिरेपली, मरनेली, रायगट्टा गोलाकर्जी, तिमरम, गुड्डीगुडम झिमेला आदी गावांतील शेतकऱ्यांना कमलापुर येथिल धान खरेदी केंद्रात जावून धान विक्री करावे लागत असल्याने या परिसरातील नागरिकांना आर्थिक, मानसिक, त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे मौजा राजाराम येथे धान खरेदी केंद्रासाठी 4 एकर जागा ग्रामपंचायतची असून सदर जमिनीवर वन व्यवस्थापन समितीची गोडावून उपल्बध झाले आहे.
सदर जागेची रजिस्ट्री (नोटरी) ग्राम पंचायत आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था राजाराम या नावानी करुन देण्यास तयार असून या खारीप हंगामात राजाराम येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावी अशी निवेदन देण्यात आली. आज खांदला येत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था राजाराम च्या वतीने वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेत शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभापती श्री. सदू पेंदाम, उपसभापती श्री. प्रफुल नागुलवार, व सचिव श्री. गोकुल भट्ट साहेब यांना निवेदन दिले आहे.
निवेदन देतांना आदिवासी वि. कार्यकारी सह. संस्थेचे संचालक श्री. अरविंद परकीवार, तिरुपती दुर्गे, अहेरी पं. सं.माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, श्री. नारायण कंबगोनिवार, सतय्या गड्डमवार,मुत्ता पोरतेट कोंडय्या केकरलावार, बाबुराव कंबगोनिवार, किशोर मोतकुरवार, तिरुपती मोतकुरवार,रंगय्या गड्डमवार, विजय अंबलीपवार, रंगा आलाम,इस्पता गावडे,दादा राव सोयाम,व शेतकरी बांधव उपस्थित होते.