एटापल्ली (जि. गडचिरोली) : पंचायत समिती एटापल्लीची वार्षिक आमसभा ३० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. या सभेला लांबून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांनाही आमदार व त्यांच्या सोबत येणाऱ्या मंडळींप्रमाणेच सन्मान आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आमसभेत येणाऱ्या जनतेसाठी बसण्याची सोय, प्यायला थंड पाणी, चहा, नाश्ता या सुविधा देण्यात याव्यात. कारण ही सगळी व्यवस्था जनतेकारिता बनलेली आहे, म्हणूनच सर्वाना समान संधी व सुविधा देणे प्रशासनाची जबाबदारी आहे, व तसेच प्रत्येकाला आपले समस्या मांडण्याचा सामान संधी द्यावी असे कम्युनिष्ट पक्षाने स्पष्ट केले आहे.
हे निवेदन तेजस गुज्जलवार (शहर सचिव) व सुरज जक्कुलवार (जिल्हा कार्यकारिणी सदस्य, भाकपा) यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली यांना सादर केले. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी भूषण चौधरी उपस्थित होते.