चिन्ना वटरा पुलियाची उंची वाढवून २५गावाची समस्या दूर करा #संदीप कोरेत

220

अहेरी देवलमारी / रेघुंठा मार्गावरील चिन्न वटरा गावाजवळील अहेरी/सिरोंचा दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलियाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात एक एक महिना हा रस्ता बंद राहत असल्यामुळेनाल्या पलीकडील अंदाजे २५गावांना दळणवळण, औषधोपचार, व्यापार व ईतर गोष्टी साठी स्वताचे जीव धोक्यात घालून नावेवर प्रवास करावा लागत असल्यामुळे चिन्न वटरा या गावाजवळील कमी उंचीच्या नाल्याची उंची वाढवावी अशी मागणी शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्फत जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जी जयस्वाल साहेब यांच्या कडे निवेदना मार्फत केली
पावसाळ्यात रेघुंठा परिसरातील गावाचा पूर्ण जगाशी संबंध तुटून त्याला एका बेटाचे स्वरूप प्राप्त होते तालुका मुख्यालय सिरोंचा जाणारे दोन हि मार्ग पावसात बंद होत असल्यामुळे त्यांना अहेरी किंवा जिल्हा स्थानावर जाण्यासाठी एकमेव मार्ग रेघुंठा देवलमारी अहेरी हा आहे पण अहेरी तालुक्यात येणाऱ्या चिन्न वटरा जवडील कमी उंचीच्या पुलिया मुळे हा नाला पावसाळ्यात जवळपास बंदच राहते व हा नाला बंद असल्याने अहेरी तालुक्यातील वेंकटापूर, आवलमारी, कर्नेली , लंकाचेन असे ४ ते ५तर सिरोंचा तालुक्यातील झेंडा, बोंड्रॉ, मोयाबिनपेठा, कोटापल्ली , रेगुंटा, नरसिंहपल्ली, पापयपल्ली, मुलदिम्मा, येल्ला, पिरमेळा, परसेवाळा, चिकेला, जाफराबाद, टेकाडा तल्ला, नेमाळा, बोरामपल्ली, १६ते १७ गावाचा सम्पर्क पूर्ण जगाशी तुटल्यामुळे या गावांनामेडिकल दळणवळन , व्यापार, शिक्षण सरकारी कार्यालय तील कामे अश्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे वटरा या गावाजवळील नदी च्या पुलियाची उंची वाढवून त्या समस्या ग्रस्त २०ते २५च्या वर गावाची समस्या दूर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सह पालकमंत्री आशिष जी जयस्वाल साहेब यांच्या कडे केली