संदीप कोरेत यांनी वाघाच्या हल्ल्यात जखमी गुराखी शिवराम बामणकर यांची भेट घेऊन केली विचारपूस

532

अहेरी:

सकाळी गावातील गुरे घेऊन चिरेपल्ली च्या जंगलात चरायला गेलेल्या गुराखी शिवराम बामणकर यांच्यावर वाघांनी हल्ला केला असता ७६वर्षीय गुरख्याने वाघासोबतच दोन हात करून त्याला पळून जाण्यास भाग पाडले पण या लढाईत शिवराम गंभीर जखमी झाला तरी तो दोन किलोमीटर जखमी अवस्थेत चालून घरी आला असता गावातील लोकांनी वनविभागास माहितीदेउन कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केला असता तिथून त्यांना अहेरी रेफर करण्यात आले ही माहितीरमेश बामण कर यांनी शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप भाऊ कोरेत यांना दिली असता क्षणाचा पण विलंब न करता अहेरी दवाखान्यात जाऊन परिवाराची भेट घेतली व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते त्यांना सर्व सहकार्य करण्यास सांगितले