राजवाड्यात राजमाता राणी रुक्मिणी देवींना चाहत्यांच्या गर्दीतून शुभेच्छांचा वर्षाव अहेरी राजवाड्यात मोठ्या भव्य-दिव्य उत्सवाचे स्वरूप.

54

*अहेरी:-* अहेरी इस्टेटच्या राजमाता, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा विदर्भातील नामांकित धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा राजमाता राणी रुक्मिणी देवी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या रोषणाई,आतिषबाजी, करीत संपूर्ण अहेरी राजनगरी दुमदुमली.

अहेरी उपविभागातील राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती, स्थानिक व्यापारी संघटना,विविध सामाजिक संस्थांची तथा नाविस/भाजप पक्षांचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नगरातील वार्डा- वार्डातील महिलांनी पुष्पगुच्छ व भेट देऊन राजमाता राणी रुक्मिणी देवी यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव केला.

अहेरी राजमहालात आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांचे सुपुत्र माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज, कुमार अवधेशराव बाबा,प्रवीणराव बाबा,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.