वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी जखमीचे सुनबाई सविता बामनकर व गावकर्‍यांनी धामनगे राऊडआफिसर यांना राजाराम निवेदन देण्यात आले

153

राजाराम :
अहेरी तालुक्यातील राजाराम गावाच्या हद्दीत दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी साकाळी क.नं. 157 या जंगलात बैल चारण्यासाठी गेलेल्या शिवराम बामनकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थानी घटनास्थळ गाठून शेतकऱ्याला त्यांना मदत करून गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी शेतकऱ्यांच्या पसुनबाई सविता बामनकर व गावकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सदर घटना घडल्या नंतर परिसरातील नागरिक धास्तावले असून त्या शेत शिवारातून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे अशीही मागणी जोर धरू लागली आहे वन विभागाने गस्त वाढवून शेतकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा असे निवेदनाता म्हटले आहे त्या वेळी उपस्थित
सुरेश पेंदाम अरविंद परकिवार रोशन कंबगोनिवार रविद्र पजालवार मनोज शिडाम
गोपाल चेदनखेडे साधू पेंदाम व गावकरी उपस्थित होते.