सालबादा प्रमाणे यंदाही नवदुर्गा मातेची राजवाड्यात प्रतिष्ठाना
आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत
सुख, शांती, समृद्धी नांदो अशी मनोकामना केले
*अहेरी:*- येथील माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी नवदुर्गा मातेचे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आले.
भक्तिमय वातावरणात डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत नवदुर्गा मातेचे प्रतिष्ठापना करण्यात आले.यावेळी पुत्र हर्षवर्धनराव बाबा आत्राम, तनुश्रीताई आत्राम, किष्किंद्रराव बाबा आत्राम व राजपरिवारातील अन्य सदस्य व भाविक उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी , राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदो आणि सुजलाम् सुफलाम् येवो अशी माताचरणी मनोकामना केले.