दंड ठोठावले; मात्र वसूलीस तहसिलदार असमर्थ – भामरागड व अहेरी तहसिलदाराची चौकशीचे महसुलमंत्र्यांना साकडे

342

प्रतिनिधी//

अहेरी:
भामरागड तालुक्यातील रेती घाटातून २०२२ मध्ये रेतीचे उत्खनन न करता अन्य ठिकाणावरुन रेती चोरुन शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदारावर कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती़ मात्र सदर रक्कम वसूल करण्यात तहसिलदार असमर्थ ठरले असल्याने या प्रकरणी भामरागड तहसिलदार यांची चौकशी करुन दंडात्मक रक्कम शासन जमा करावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हा दौ-यावर आलेल्या महसूलमंत्री चंदेशेखर बावनकुळे यांचेकडे निवेदनातून केली आहे़
निवेदनात म्हटले आहे की, सन 2022 मध्ये भामरागड तालुक्यातील रेती घाटातून रेती उत्खनन न करता इतर अन्य ठिकाणावरून चोरी करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या कंत्राटदार कंपनी विरुद्ध मी स्वत: तक्रार दाखल केले होती. त्या अनुषंगाने तत्कालीन तहसीलदार भामरागड यांनी १ कोटी १९ लाख रुपये दंड ठोठावले. या प्रकरणात दोषी आढळलेले कंत्राटदार कंपनीने न्यायालयात धाव घेतली़ यावर तक्रारदार म्हणून मी स्वत: न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करून सदर प्रकरण रिमांड बॅक होईपर्यंत पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही भामरागडचे व तहसीलदार यांनी प्रकरणाला गंभीरतेने न घेता दिरंगाई करीत न्यायालयाचे अवमान केल्या गेले़ सदर कालावधीतच अहेरी तहसीलदारांनी त्याच कंपनीवर ८४ लाख रुपयाचे दंड ठोठावले. मात्र सदर दंडात्मक स्वरुपाची दोन्ही रक्कम वसूल करण्यास ते असमर्थ ठरले आहे़ त्यामुळे सदर दोन्ही प्रकरणातील तहसीलदारांकडून चौकशी करून दंड झालेली २ कोटीची रक्कम शासन जमा करावी, जेणेकून सदर रक्कम विकास कामात उपयोगी आणता येईल, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी महसूलमंत्री बावणकुळे यांचेकडे निवेदनातून केली आहे़