स्मशानभूमीत वराहपालन व्यवसायिकाकडून अतिक्रमण; अंत्यविधीवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी. घटनास्थळी भाग्यश्री ताई आत्राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांची भेट.

389

नागेपल्ली (ता. अहेरी) – अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील अहेरी -अल्लापल्ली मार्गावर आयटीआय च्या लगत आरक्षित स्मशानभूमीत पुन्हा एकदा वराहपालकांनी अतिक्रमण केल्याने ग्रामस्थांचा रोष उसळला असून अंत्यविधीच्या वेळीच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती या घटनास्थळी उपस्थित असलेल्या संपूर्ण गावकऱ्यांशी संपर्क साधत घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीताई आत्राम यांनी घटनास्थळ गाठले.

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेत पुढील कारवाईस बोलले.

ग्रामपंचायतीने सुमारे वर्षभरापूर्वी स्मशानभूमीवरील बेकायदेशीर वराहपालन व्यवसायिकांना हटवले होते. मात्र, वराहपालन व्यवसायिकांकडून पुन्हा त्याच ठिकाणी कब्जा केला होता. काल सायंकाळी गुरूनुले कुटुंबातील एका पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आरक्षित स्मशानभूमीत अंत्यविधी करत असताना वराहपालकांनी विरोध करीत वाद निर्माण केला.

हा वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गटांमध्ये सात ते आठ जणांनी परस्परांना मारहाण केली. या झटापटीत दोन्ही बाजूंनी जखमी झाले असून ग्रामपंचायत परिसरात तणावाचे वातावरण आहे.