गरजेपेक्षा कमी वीज युनिट वापर प्रकरणः किशोर करहऱ्हाडेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे तक्रार.
शहरातील मायाश्री फुड इंडस्ट्रीज यांनी हंगाम २०२२-२३ मध्ये भरडाई करीता शासकीय थान खरेदी केंद्रावरुन धानाची उचल केली होती. उचल केलेल्या धानाच्या प्रमाणात भरडाई करीता वीज खर्च होणे आवश्यक होते. मात्र नाममात्र युनिट वीज खर्च केल्याची गंभीर बाब आदिवासी विकास महामंडळ नाशिक कार्यालयाने गठित केलेल्या चौकशी समितीनेच चव्हाट्यावर आणली असल्याने या गंभीर तेवढ्याच धक्कादायक प्रकरणात सदर राईसमिलर्सला दोषी धरून त्याचेवर जीवनावश्यक वस्तु कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून मिल कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडे यांनी उपमुख्यमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
विभागाचे मंत्री अजित पवार यांचेकडे केलेल्या तक्रारीतुन केली आहे. यामुळे राईसमिल धारकांत चांगलीच खळबळ माजली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावरुन भरडाई करीता २० हजार २०५.०५ क्विंटल धानाची उचल केली होती. उचल केलेल्या दिलेल्या तक्रारीत कहाडे यांनी नमूद केले आहे की, देसाईगंज येथील मायाश्री फुड इंडस्ट्रीज या गिरणीधारकाणी पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धानाच्या भरडाई करीता १६ हजार १६४ युनिट वीज खर्च होणे आवश्यक असल्याचा सादर केला होता. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिकच्या कार्यालयाने गठित केलेल्या चौकशी समितीने नमुद केले होते. परंतु सदर राईसमिलने फक्त ३७१ युनिट वीज खर्च केले असुन तब्बल
१५ हजार ७६३ युनिट वीज कमी खर्च केल्याची गंभीर बाब दि.६ सप्टेंबर २०२३ च्या पत्रानुसार उघडकीस आणुन पुढील कारवाई करीता चौकशी अहवाल संबंधित कार्यालयाला सादर केला होता.
दरम्यान फक्त ३७१ युनिट वीज खर्च केल्याने मायाश्री फुड इंडस्ट्रीज या गिरणीधारकाने उचल केलेल्या धानाची भरडाई केलीच नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे धानाची
भरडाई झालीच नसल्याने उचल केलेला धान परस्पर खुल्या बाजारात विक्री करून शासनाला परराज्यातील मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा दक्ष नागरीकांनी दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी गडचिरोली येथील दिसून येते. शासकीय गोडाऊन मध्ये मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ पकडला केल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान देसाईगंज येथील मायाश्री फुड इंडस्ट्रीज व त्याच परिवारातील राईस इंडस्ट्रीज यांचा गडचिरोली येथील शासकीय गोडाऊन मधून मानवी खाण्यास अयोग्य तांदूड पकडला
होता. तसेच माजी खासदार रामदास तडस यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्र. ३४५३८ दि.३० जुलै २०२२ रोजीच्या पत्राद्वारे आरमोरीच्या शासकीय गोडाऊन मधुन हिंगणघाट जि. वर्धा येथे मायाश्री फुड इंडस्ट्रीज व मायाश्री राईसमिल देसाईगंज यांचेकडून मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ पुरवठा करीत असल्याबाबत जिल्हाधिकारी वर्धा व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना कळविले होते. त्या अनुषंगाने मायाश्री फुड इंडस्ट्रीजचा असल्याच्या सवयीचा असल्याचे गिरणीधारक शासकीय धान खरेदी केंद्रावरुन भरडाई करीता धानाची उचल करून धानाची भरडाई न करता परस्पर बाजारात विक्री करीत
सदर राईसमिलचे मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ वारंवार
रंगेहाथ पकडल्या जाऊनही तसेच आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक कार्यालयाने गठित केलेल्या चौकशी समितीने गरजें पेक्षा अतिशय कमी युनिट वीज वापर केल्याचा ठपका ठेवूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने या प्रकरणात संबंधित विभागाचे अधिकारी गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गिरणीधारक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने शासनाची जीवनावश्यक कायद्याअंतर्गत दिशाभूल करून कोट्यावधी रुपयाने फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे चौकशी अहवालाच्या अनुषंगाने मायाश्री फुड इंडस्ट्रीजवर गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी केलेल्या तक्रारीतुन केली आहे.