चामोर्शी – तालुक्यात टस्कर हत्तीचा हौदोस सुरू

470

अनिल कांदो तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -०३/०८/२०२५

चामोर्शी – तालुक्यातील मौजे येडानुर, लसनपेठ, नारायणपूर, जैरामपुर परिसरातील गावात मागील चार-पाच दिवसांपासून टस्कर हत्तीचे आगमन झाले असून सदर हत्तीने अनेक घर व खरिप हंगामातील शेतपिकाचे नुकसान केले आहे परंतु सध्या कोणतीही जीवितहानीची घटना घडली नाही अशी घटना घडली जाऊ नये म्हणून वनविभागातील अधिकारी व कर्मचारी नियमित लक्ष देऊन गावा-गावात जाऊन हत्ती पासुन सावध राहण्याकरिता अलर्ट केले जात आहे .
या हत्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे विशेषतः राञो गावात जाऊन घराचे नासधूस केली जाते व दिवसा वनांच्या आश्रयस्थानी राहत असते.सदर हत्ती मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नुकसान धारकाकडुन केली जात आहे..