भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मुलचेरा येथे एम व्ही बासनवार यांनी मुख्याध्यापक पदाचा स्वीकारला पदभार. *अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेराच्या वतीने सत्कार*

299

प्रतिनिधी//

मुलचेरा :- दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी एम व्ही बासनवार यांनी भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मुलचेरा येथे मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. बासनवार सर यापूर्वी भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,राजाराम खांडला येथे कार्यरत होते.
मुख्याध्यापक पदावर रुजु झाल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा च्या वतीने एम व्ही बासनवार सर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुकाध्यक्ष सतीश पोरतेट, महेश गुंडेतीवार, दिनेश मडावी यांच्यासह शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.