अखिल भारतीय आदिवासी विकास युवा,परिषद तर्फे ऍड. विश्वजित कोवासे यांचा सत्कार

92

प्रतिनिधी//

गडचिरोली :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. मा. विश्वजित मारोतराव कोवासे यांची भारतीय युवक काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारणी मध्ये राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिले. व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, संपर्कप्रमुख बादल मडावी, मिडिया जिल्हाप्रमुख रुपेश सलामे, चामोर्शी तालुका अध्यक्ष सुमित कुमरे, रोहित आत्राम, शशिकांत गेडाम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.