सुर्यपल्ली येथील विहिरीतील पाणी दूषित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

143

प्रतिनिधी//

अहेरी :
तालुक्यातील सुर्यपल्ली येथील चौकातील असलेल्या विहिरीतील पाणी दूषित झाले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.गावातील सार्वजनिक पाण्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनाची आहे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आहे.मात्र या समितीचा काहीही उपयोग नाही.या विहिरीत गेल्या तिन वर्षा पूर्वी ब्लिचिंग पावडर टाकले काही दिवस पाणी व्यवस्थित होते.त्यानंतर गेल्या विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला दिली आहे.तसेच ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधला तरी.विहिरीतील पाण्याचे तपासणी करून दूषित पाणी निर्जंतूकीकरण करण्यात यावे अशी मागणी सुर्यपल्ली गाववासी केले आहे.