अहेरी पंचायत समिती अंतर्गत राजाराम गावातील नाल्या साफ सफाई कडे ग्रामपंचायतचे जाणूनबुजून दुर्लक्ष ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

160

प्रतिनिधी//

*अहेरी*

अहेरी : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायत मध्ये मेघगर्जने सह जुन महिन्यात पावसाला सुरवात झाली आहे.परतु ग्रामपंचायत राजाराम कडुन गावातील अंतर्गत नाले साफ सफाई कडे दुर्लक्ष केले जात आहे.
.हवामान खात्याकडून मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे .असून उन्हाळ्यामध्ये नाल्यांची साफ सफाई व्हायला पाहिजे होती.
परंतु गावातील नाल्यांची साफ सफाई अजून पर्यंत केलेली नसल्याने नाल्या साफ सफाईचा विसर पडला की काय असा प्रश्न पडलेला आहे. गावातील अनेक प्रभागातील नाल्या घाणीने तुडुंब भरून आहे.नाल्यातील घाणीचे उपसा करण्यात न आल्याने दुर्गंधी पसरत चाललेली असून त्याचा परिणाम गावातील लोकांच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

राजाराम ग्रामपंचायतचे पदअधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहात की, काय असा सवाल जनतेतून करण्यात येत असल्याने पाऊस पाणी घराघरांमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.ह्या सर्व बाबी गंभीर असून ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
घरटंक्स पावती तर बरोबर घेतात तर नाली साफ सफाई कडे दुर्लक्ष का करीत आहेत. असाही सवाल निर्माण होत आहे.

राजाराम येथील नाल्या उपसा करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांना वारंवार सांगीतले जात असून देखील त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहेत. नाल्यांची साफसफाई न गावात साथीचे रोग पसरण्याची तसेच घरात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.या करिता लवकरात लवकर गावातील ग्रामपंचायत चे सचिव व सरपंचा जातीने लक्ष देऊन राजाराम परिसरातील नाली साफ सफाई करण्याची मागणी जनतेतून केली आहे.