मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान ड्रोन आणि उड्डाण उपकरणांवर बंदी

242

प्रतिनिधी//

गडचिरोली, 21 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै 2025 रोजी गडचिरोली व मौजा कोनसरी येथे नियोजित दौरा पार पाडण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून, रिमोट कंट्रोल उड्डाण साधने इत्यादींचा वापर होऊ नये म्हणून गडचिरोली व मौजा-कोनसरी येथील कार्यक्रम स्थळाभोवतालचा ५ किमी परिसर तसेच संपूर्ण गडचिरोली शहर आणि जिल्हा ‘उड्डाणबंदी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात येत असल्यसाचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते 23 जुलै 2025 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत वरील प्रकारच्या उड्डाण साधनांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे. “ड्रोन नियम 2021” अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आलेला असून, त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.
000