प्रतिनिधी//
गडचिरोली :- सम्राट अशोक बुद्ध विहार अशोक वन कॉलनी गोकुळनगर येथे लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला . वर्षावास सुरु असतांना प्रबोधन मालिका अंतर्गत स्मृतिदिन घेण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर आरपिआय जिल्हाध्यक्ष हे होते . प्रमुख मार्गदर्शक बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , दशरथ साखरे आरपिआय जिल्हा उपाध्यक्ष , प्रमोद राऊत प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा , तुळशिराम सहारे माजी नगरसेवक , कवी खेमचंद हस्ते , डोमाजी गेडाम , नरेंद्र शेंडे , रोशन उके होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की , अन्नाभाऊ साठे यांनी शाहीरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून जागृत केले . त्यामुळे त्यांना लोकशाहीर अन्नाभाऊ साठे म्हणतात . प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर म्हणाले की, जग बदल घालून घाव – मज सांगून गेले भिमराव याचा अर्थ की प्रचलीत उचनिचतेची समाज व्यवस्था बदलायची असेल तर या व्यवस्थेवर घाव घालावे लागेल. तसेच दशरथ साखरे , प्रमोद राऊत , खेमचंद हस्ते , डोमाजी गेडाम , नरेंद्र शेंडे , रोशन उके यांनीसुद्धा विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे संचलन दामोधर शेंडे यांनी केले तर आभार निशा बोदेले यांनी मानले .
या कार्यक्रमाला मधुकर लाटीलवार , भिमराव गोंडाणे , कृष्णा भैसारे , हेमंत बारसागडे , हेमंत उंदिरवाडे , प्रेमलता कान्हेकर , सुकेशिनी रामटेके , माया मेश्राम , युविका गोवर्धन , सविता लाटीलवार , निता उंदिरवाडे , अमिता भैसारे , कोमल भैसारे , तिलीस्मा शेंडे , लक्ष्मी उंदिरवाडे , देवला डोंगरे , येशोधरा शेंडे बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते .