जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांची क्षेत्रसहायक पळसगाव यांच्या मार्फत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे निवेदनातून मागणी
आरमोरी – आरमोरी तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना धान पिकात खर्च जास्त उत्पादन कमी त्यामुळे दरवर्षी शेतकरी पिकवून नसल्यासारखे होत असल्यामुळे वारंवार कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवर ओलांडत होता
त्यामुळे शेतकऱ्यांनी नदि नाल्यावर किंवा विहीर बोअरवेल जमिनीवर खोदुण उन्हाळी मका पीक जंगला लगत शेकडो एकर मध्ये मोठ्या प्रमाणात लावलेला आहे परंतु मकाला कनिश लागले एका महिन्यात मका पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असताना जंगलातील वन्य प्राण्यांनी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत
आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून वन विभागाने वन्यप्राण्यांपासून पिकाची होणारी नुकसान पासून संरक्षण करणे व वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोलर कुंपण व शाट मशीन तात्काळ पुरवठा करण्याचा प्रावधा लगतच्या ब्रह्मपुरी वन विभागात दरवर्षी शेतकऱ्यांना
शामा प्रकाश मुखर्जी योजनेअंतर्गत शाट मशीन सोलर कुंपण पुरवठा करण्यात आलेले आहे.त्याच धर्तीवर वडसा उपवन विभागातील आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा पळसगाव पाथरगोटा कासवी आष्टा अतरजी सालमारा ठाणेगाव रामपूर कनेरी वैरागड परिसरातील मका पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी वनविभागाने वन्य प्राण्यांपासून प्रादुर्भाव असलेल्या शेतकऱ्यांना सोलर कुंपण व शाट मशीनी तात्काळ पुरवठा करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम
यानी पळसगाव क्षेत्रसहायक गाजी शेख यांच्या मार्फत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
यावेळी पळसगाव वन क्षेत्र सहाय्यक गाजी शेख.वनरक्षक दिगाबर गेडाम वनरक्षक सहारे मैडम वनरक्षक करकाडे मैडम वनरक्षक वालदे मैडम उपस्थित होते.