-एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी येथील सौ.आशाबाई स्व. दौलत मठ्ठामी यांचे चिरंजीव *चेतन* यांचा विवाह परपनगुडा येथीलसौ. तानीबाई रूपु नरोठे यांची कन्या *मोनिका* हिच्याशी दिनांक 29 मे रोजी वाघेझरी येथे वराचे मंडपात संपन्न झाला आहे.
मठ्ठामी परिवाराच्या विनंतीला मान देत सदर विवाह सोहळ्यास शिवसेना नेते संदीपभाऊ कोरेत यांनी उपस्थित राहून नवं दाम्पत्याला पुढील वैवाहिक जीवनाचे शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
या प्रसंगी संदीपभाऊ कोरेत सह अमित बेझलवार, मठ्ठामी व नरोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते.